26.6 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home शैक्षणिक किरसान मिशन मध्ये प्रदुषन मुक्त दीपावली

किरसान मिशन मध्ये प्रदुषन मुक्त दीपावली

0
42

गोरेगाव,दि.01 :-स्थानिक किरसान मिशन व जुनिअर कॉलेज गोरेगाव येथे सर्व विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये दीपावली उत्साहाणें साजरी केली. अनेक विद्यार्थ्यांनी दीपावली ग्रेटींग कार्ड व दीपावली दिवे, रांगोळी आपल्या हाताने बनवल्या. सर्व विद्यार्थ्यांनी एक मेकांना गोड पदार्थ देउन मित्रता बंधु भाव व सहकार्य मूल्याची जोपासना केली. ओझोन दिवसाच्या संकल्पावर आधारित सर्व विद्यार्थ्यांनी प्रदूषण रहित दीपावली साजरी करण्याचा दृढ संकल्प घेतला. त्याच प्रमाणे आपल्या सभोताली पर्यावरण संरक्षण व प्रदुषणा बाबत जगरूकता करण्याचा निर्धार केला. हया वेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. एन. डी. किरसान, यांनी सर्व विद्यार्थ्यांचे हस्त कलेचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. विनोद उके, शिक्षिका गीता जगणित, मंगला जांभुळकर, लक्षमी चौरसिया, माधुरी बघेले, गोदावरी डोहळे, सरिता चिपे, गाण्येशोरी पटले, छाया हरिणखेडे, ममता चौधरी, माधुरी गोदुले, मीरा साठवणे, पुष्पलता सोनवाने, सुनील रहांगडाले, प्रमोद रहांगडाले, केशव मेश्राम, सुभाष चुलपार, दर्मेन्द्र राऊत, सचिन रामटेके उपस्थित होते.