गोंदिया,दि.02 : हंगामाच्या ऐन शेवटच्या टप्प्यात शेतमाल घरी आणण्याच्या वेळी परतीच्या पावसाने शेतकर्यांना प्रचंड अडचणीत आणले. मोठ्या प्रमाणात पिकांची नुकसान झाले असून गोंदिया,तिरोडा,अर्जुनी मोरगाव मतदारसंघात याचा सर्वाधिक फटका बसलेला आहे.मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिल्यानंतर आज अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांच्यासोबत जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली,कनेरी,कोकणा तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी या गावांना भेट देऊन नुकसान झालेल्या धानपिकाची पाहणी केली.त्यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा कृषी अधिक्षक नाईनवाडे,जि.प.गटनेते गंगाधर परशुरामकर,जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे,अविनाश काशिवार,तालुका कृषी अधिकारी पात्रीकर,डी.एल.तुमडाम होते.
तर गोंदिया तालुक्यात आमदार विनोद अग्रवाल यांनी शेतपिकाची पाहणी करीत त्वरीत सर्वेक्षण करुन मदत देण्याची मागणी केली.कोणताही पीडित शेतकरी सर्वेक्षण व मदतीपासून वंचित राहू नये, या बाबीची दखल घ्यावी, असे निर्देशही आ.विनोद अग्रवाल यांनी यंत्रणेला दिले आहे.नुकसानग्रस्त धानपिकाच्या पाहणीवेळी तहसीलदार राजेश भांडारकर, तालुका कृषी अधिकारी डी.एल.तुमडाम, कृषी अधिकारी (पं.स.) रहांगडाले, जिल्हा कृषी अधिकारी अनुप शुक्ला, महसूल अधिकारी तिवारी, मुनेश रहांगडाले,गजेंद्र फुंडे, कमलेश सोनवाने, सरपंच राजेश कोल्हे, रामु नशिने यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.