29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाची एकदिवसीय व्यक्तित्व विकास कार्यशाळा

गोंदिया जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाची एकदिवसीय व्यक्तित्व विकास कार्यशाळा

0
45
गोंदिया,दि.02ः-गोंदिया जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघा द्वारे आयोजित एक  दिवसीय व्यक्तित्व विकास कार्यशाळा 1नोव्हेंबर 2019 शुक्रवार ला प्रोमो शिक्षा भवन कुडवा नाका येथे पार पडली. गोंदिया जिल्हयातील वृत्तपत्र विक्रेता यांच्या आयुष्यातील जळण-घडणीत परिवर्तन यावा व ते समाजातील मुख्य प्रवाहात इतर लोकांप्रमाणे आपले जीवणगाणे सुरळीतपणे पार पाडावे  त्यांना त्यांच्या उद्योगात येणा-या अडचणी वर मात कश्या प्रकारे करता येईल व जीवनमान उंचावण्या करिता आयुष्यात काय करावे या करिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 1 नोव्हेंबर 2019 ला प्रोमो शिक्षा भवन कुडवा नाका येथे करण्यात आले होते. एकदिवसीय कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आज संस्थेची संचालिका मंजू कटरे ,वृतपत्र विक्रेता संघाचे राज्य उपाध्यक्ष दिनेश उके, पत्रकार संजय राउत, विरेंद्र अग्रवाल, जावेद भाई यांनी वृत्तपत्र विके्रता बांधवांना संबोधित करत त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याकरिता आपल्या छोेटयाश्या धंदा ला कश्या प्रकारे करावे, अधिकाधिक लोकांना कश्या प्रकारे जोडता यावे,लोकांशी दैनंदिन व्यवहार करतांना तुमची वागणूक कशी असावी, आयुष्यात  एखादे मोठे संकट उद्भवल्यास त्याचा सामना कश्या प्रकारे करावा व आपले राहणीमान इतर लोकांप्रमाणे कसे सुधारित करावे याबद्दल ची माहिती सर्व प्रशिक्षकांनी वृत्तपत्र विक्रेता बांधवांना दिली. सोबतच त्यांना दररोज उद्भवणा-या समस्यांना ऐकून त्यावर तोडगा कश्या प्रकारे काढावा याबद्दल ची सविस्तर माहिती दिली. कार्यशाळचे संचालन दिनेश उके यांनी तर आभार प्रदर्शन हर्षदीप उके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता  वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भोयर, दुर्गाप्रसाद अग्रहरी,राजेश वैद्य,भास्कर कडव, महेश तरोणे, केवल लांजेवार, काका भोयर, संजू दोनोडे आमगाव, कस्तुर सोनवाने, मैनुद्दीन गौरी,दिनेश वैद्य,प्रविण कोचे, राजू द्वारे, नरेंद्र राउत,रीता चैधरी,किशोर जैसवाल, प्रमोद तुरकर, संतोष कोठेवार, अनिमेष रामटेके,पृथ्वीराज मेश्राम गोरेगाव, जगदीष शहारे सडक अर्जुनी, संजय बडोले मोरगाव अर्जुनी, अमीत गणवीर आदि उपस्थित होते.