वाशिम, दि. ३ : राज्याचे कृषि मंत्री डॉ. अनिल बोंडे हे आज, ४ नोव्हेंबर २०१९ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
कृषि मंत्री डॉ. बोंडे हे ४ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता बाळापूर (जि. अकोला) येथून वाहनाने मेडशी (ता. मालेगाव) कडे प्रयाण करतील. दुपारी ३.१५ वाजता त्यांचे मेडशी येथे आगमन होईल. याठिकाणी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व शेतकऱ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता ते मेडशी येथून जांभरून परांडे (ता. वाशिम)कडे प्रयाण करतील. सायंकाळी ४.३० वाजता जांभरून परांडे येथे त्यांचे आगमन होईल. या परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कृषि मंत्री पाहणी करतील व शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
कृषि मंत्री डॉ. बोंडे हे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात सायंकाळी ५.३० वाजता वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी व सर्व संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतील.




