गोंदिया,दि.05ः-दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात २ नोव्हेंबर रोजी पार्कींगच्या जागेवरून पोलीस आणि वकिलांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी कोर्ट परिसरातच गोळीबार केल्याने भडकलेल्या वकिलांनी पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करीत मारहाण केली. तसेच पोलिसांनीही वकिलांना चांगला चोप दिला. या घटनेच्या विरोधात सोमवार, ४ नोव्हेंबर येथील जिल्हा न्यायालय परिसरात जिल्हा वकील संघाव्दारे घटनेचे अध्यक्ष टी.बी. कटरे यांचा नेतृत्वात निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी अँड. कृष्णा पारधी, अँड. सचिन बोरकर, अँड.पी. झेड. शेख, अँड. पराग तिवारी, अँड. इन्द्रकुमार होतचंदानी, अँड. वसंत चुटे, अँड. शबाना अनसरी, अँड. मीना भोयते, अँड. वर्षा डोंगरे, अँड. अलका बोकडे., अँड. रंजिता शुक्ला, अँड. पूनम अग्रवाल, अँड. आरती भगत, अँड. अरुण उपवंशी, अँड. राजेश भाजीपाले, अँड. मनीष नेवारे, प्रमोद फुंडे, मोबिन शेख, प्रकाश तोलानी, प्रमोद अग्रवाल, एस.के. गडपायले आदी उपस्थित होते.




