31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जैवविविधतेतून विकासवादी नेतृत्वाची कास धरा: डॉ. कटरे

जैवविविधतेतून विकासवादी नेतृत्वाची कास धरा: डॉ. कटरे

0
39

गोंदिया,दि.05 : आजघडीला रोजगाराच्या संधी लोपपावत आहेत. अनेक बेरोजगार नौकरीच्या शोधात आपल्या आयुष्य खर्ची घालत आहेत. मात्र यश मिळत नसल्याने ते निराश होत आहेत. तेव्हा बेरोजगारांनी शेती उद्योगाकडे वडून जैविक शेतीला महत्व देत विकासवादी नेतृत्वाची कास धरावी, असे मत आरोग्य भारतीचे डॉ. प्रशांत कटरे यांनी मांडले. ते स्थानिक पोवार बोर्डिंग येथे आयोजित दिवाळी मिलन समारोहात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
आधुनिक काळात शेतीचे रुप पालटले आहे. अधिकारी उत्पादनाच्या नादात रासायनिक व कीटकनाशक साहित्याचा वापर होत असल्याने आपल्या शरीरात एक प्रकारे विष जात आहेत. हा प्रकार शरीरा घातक आहे. तेव्हा जैविक शेतीच्या माध्यमातून शेती उद्योग करावे, तसेच विष मुक्त अन्न कसे तयार करता येईल, यावर आपले कार्य शुरू असून त्यासाठी युवकांनीही पुढाकार घ्यावा, जेणेकरून भविष्यात या माध्यमातून विकासात्मक रोजगार उपलब्ध होईल, असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला अर्जुनी मोरगाव तालुक्याचे कृषी तज्ज्ञ देवेंद्र राऊत यांच्यासह माजी आमदार हेमंत पटले,कैलाश हरिणखेडे, बसंत गणवीर, यादोराव गणवीर, राजेश तवाडे,रेखलाल टेंभरे संतोष चव्हाण, राजा बंसोड, बदर शेख, दिनेश दादरीवाल, बाळा अंजणकर, कुणाल बिसेन, श्याम चंदनकर, डॉ. शाहू, डॉ. कारडा, डॉ. राहुल शुक्ला, डॉ. ललीत रहांगडाले, डॉ. वाकुलकर,पंकज रहांगडाले, छाया दसरे, मैथुला बिसेन, मयुर दरबार,  हेमलता पतेह, संजय कुलकर्णी, डॉ. विद्या सागर,बाबा बिसेन, गोकूल कटरे, सुरेश पटेल, सुरेश भक्तवर्ती यासह मोठ्या संख्येने नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

blank