28.3 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ वैद्यकीय शिक्षण संचालकांने जाणून घेतल्या बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या समस्या

वैद्यकीय शिक्षण संचालकांने जाणून घेतल्या बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या समस्या

0
33

गोंदिया,दि.05ः- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत येत असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या ढिसाळ सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच २ ऑक्टोबर रोजी ७ प्रसूती तज्ज्ञ अधिकाèयांनी राजिनामा दिल्याने आरोग्य सेवा ठप्प पडल्याने रुग्णांचीच हेळसांड सुरू झाल्याचे वृत्त प्रकाशित होताच सर्व लोक प्रतिनिधींनी या प्रकरणाकडे लक्ष घातले. शेत पिकाच्या नुकसानीचे पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्र्यासह खासदारांनी व स्थानिक आमदारांनी आठावा बैठकीतच वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना धारेवर धरत रुग्णालयाची सेवाा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले. त्यातच खासदार सुनील मेंढे व आमदार विनोद अग्रवाल यांनी रुग्णालयाची पाहणी करीत रुग्णांशी वैद्यकीय अधिकाèयांशी संवाद साधत वैद्यकीय शिक्षण संचालका व आरोग्य उपसंचालकांना लक्ष घालण्यासंबंधी सुचना केली होती. त्याची दखत घेत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्या लहाने, आरोग्य उपसंचालक डॉ. जायस्वाल यांच्या नेतृत्वातील चमूने सोमवार (दि.४) बाई गंगाबाई रुग्णालयाला भेट देत परिस्थिती जाणून घेतली.
यावेळी पथकासमोर आमदार अग्रवाल यांनी रुग्णालयासंबंधी व्यथा मांडली. या सर्व प्रकरणानंतर वैद्यकीय शिक्षण संचालकांच्या निर्देशावर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. व्ही.पी. रूखमोडे यांनी तत्काळ प्रभावाने सहा वैद्यकीय अधिकाèयांची बाई गंगाबाई रुग्णालयात नियुक्ती केली.त्यामध्ये डॉ. सयास केंद्रे, डॉ. आशा अग्रवाल, डॉ. शीतल खंडेलवाल, डॉ. राजश्री पाटिल, डॉ. गरिमा अरोरा, वं डॉ. सविता वडेरा या सर्व डॉक्टरांना ८-८ तासाचे दोन शिफ्ट मध्ये काम करण्याचे पत्र ेदेण्यात आले. मात्र त्यापैकी एकमेव आशा अग्रवाल या रुजू झाल्या. परंतु त्यांना कुठलेही सहयोगी डॉक्टर नसल्याने सोमवारलाही रुग्णालयात प्रसुती शल्यक्रिया होवू शकली नाही.
बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचा ढिसाळ कारभार दररोज वृत्तपत्रांचे बातमीचे विषय ठरले होते. तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यापासून शस्त्रक्रिया कक्ष बंद पडून असल्याने प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर मातांना रेफर-टू नागपूर असा संदेश दिला जात होता. त्यातच सर्व रुग्णांची सेवेला घेऊन हेळसांड होत असे, हा प्रकार माध्यमात जागत असतांना २ नोव्हेंबर रोजी १० प्रसुतीतज्ज्ञ डॉक्टरांनी राजिनामा देऊन रुग्णालयाच्या सेवेला वेठीस धरले. यामुळे पुन्हा बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या गंभीर बाबीची देखल घेत सर्वच लोकप्रतिनिधींनी सेवा सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्री यांनी रुग्णालयाच्या औषध खरेदीसह इतर गोष्टीसाठी नाविण्यपूर्ण योजनेतून ३ कोटी रुपयाचा निधी ही उपलब्ध करुन दिला. आमदार विनोद अग्रवाल रुग्णालयातील वर्ग २ ची पदभरती खुली करण्यात यावी, विदर्भ रेल्वे गाडीने अपडाऊन करणाèया अधिकारी व कर्मचाèयांवर लगाम लावण्यात यावा, वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाचे टेंडर काढण्यात यावे, शस्त्रक्रियेचे सर्व साहित्य व त्या संदर्भातील व्यवस्था पूर्ण करण्यात यावे, रुग्णालयात बंद असलेले यंत्र सुरू करण्यात यावे, सीटी स्कॅन मशीन त्वरीत पुरविण्यात यावी, वेंटीलेटर, एक्स-रे मशीन, सीबीएससी मशीन, सोनोग्राफी व रक्त तपासणी संदर्भातील सर्व साहित्य रुग्णालयाला पुरविण्यात यावे, अशी मागणी लावून धरली. यावर संचालक डॉ. तात्या लहाने यांनी विभागाशी त्वरीत पाठपुरावा करून मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्याच प्रमाणे वर्ग २ ची पदभरती प्रक्रिये संदर्भात लवकर नोटिफिकेशन काढण्यात येईल, असेही कळविण्यात आले.

या शिवाय रुग्णालयात अधिकाèयांच्या वाणव्याची त्वरीत पुर्तता करण्याच्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी पदभर्तीच्या संदर्भात थेट मुलाखतीसाठीही पत्र काढण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले. वर्षाकाठी ८ हजाराच्या घरात प्रसूती होणाèया बाई गंगाबाईत आज एकही प्रसूती करू शकणार नाही असा पवित्रा शुक्रवारी येथील प्रसूती तज्ज्ञांनी घेतला आहे. आठ-आठ तासाच्या तीन शिप्टनुसार कमीत कमी २० डॉक्टर प्रसूती विभागात असायला हवे. परंतु या विभागात आधीच कमी म्हणजे फक्त आठ डॉक्टर होते. त्यापैकी सहा डॉक्टरांचा बाँड संपूनही त्यांना पुन्हा नुतनीकरणाचे आदेश देण्यात आले नाही किंवा ते यायला तयार नाही. तर त्यांच्याऐवजी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. प्रसूती विभागात डॉ.राजश्री पाटील व डॉ.गरीमा बग्गा ह्या दोनच डॉक्टर दिवसभरापासून काम करीत होत्या.आठ ते दहा तास काम केल्यानंतर पुन्हा काम करणे शक्य होणार नाही म्हणून त्यांनी गर्भवतींची प्रसूती करण्यास नकार दिला. २० डॉक्टरांचे काम दोनच डॉक्टर कसे करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाèया तीन गर्भवती महिलांना १०८ रूग्णवाहिकेने गंगाबाईत आणण्यात आले. यावेळी दुपारी १ वाजताच्या सुमारास खमारी येथील एक गर्भवती प्रसूतीसाठी आली. परंतु ह्या चारही गर्भवतींना दाखल न करता घरी किंवा इतर आरोग्य संस्थेत जाण्यास सांगितले. यापूर्वी १६ गर्भवतींना परत पाठविण्यात आले होते.खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या त्या गर्भवतींना दाखल करावे, यासाठी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते गंगाधर परशुरामकर यांनी तब्बल तीन तास गंगाबाईत उपस्थित राहून वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. व्ही. पी.रूखमोडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.भूषणकुमार रामटेके , गंगाबाईच्या अधीक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्याशी चर्चा करून रूग्णांना गंगाबाईत दाखल करण्यास भाग पाडले.परंतु दाखल झालेल्या त्या गर्भवतींची देखरेख कोण करणार असा सवाल येथील उपस्थित डॉ. राजश्री पाटील यांनी उपस्थित केला.
गंगाबाई स्त्री रूग्णालयातील प्रसूती कक्षाचे प्रमुख डॉ. देशमुख आहेत. परंतु मागील दीड महिन्यापासून ते सुट्टीवर असल्याने त्यांनी कक्षाला कुलूप लावून ठेवले आहे. त्यांचा प्रभार डॉ. राजश्री पाटील यांच्याकडे देण्यात आला परंतु कक्षाला कुलूप असल्यामुळे त्यांना पत्रव्यवहार करतांना हाताने पत्र लिहावे लागत आहे.
महिनाभरापासून डॉक्टरांची मागणी करूनही वैद्यकीय अधिष्ठाता यांनी डॉक्टर उपलब्ध करून दिले नाही, अशी खंत व्यक्त केली. गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी मागील तीन महिन्यापासून जिल्हा शल्यचिकीत्सक व वैद्यकीय अधिष्ठाता यांना पत्र लिहील्याचे म्हटले आहे. तर काहेींच्या मते डॉ. हुबेकर यांच्या स्वाभावामुळे तेथील डॉक्टर व कर्मचारी नाराज असल्याचे बोलले जाते.