24.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home महाराष्ट्र प्रा.रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार समारंभ संपन्न

प्रा.रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार समारंभ संपन्न

0
37

पुणे,दि.11ः- रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानाच्यावतीने प्रा.रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार समारंभ एस.एम.जोशी सभागृहात (दि.८) पार पडला. यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार पुरस्कार ह.भ.प.दिनकर-शास्त्री भुकेले यांना तर कृतज्ञता पुरस्कार ह.भ.प.उल्हासदादा पवार यांना ८८ व्या अखिल भारतीय साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेखर महाराज कुटे, मधुकर महाराज मोरे हे उपस्थित होते.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिनंदन थोरात यांनी प्रास्ताविक केले. तर उल्हास पवार यांच्या मानपत्राचे वाचन कांचन थोरात यांनी केले तर दिनकर शास्त्री भुकेले यांच्या मानपत्राचे वाचन मीरा चिकणे यांनी केले.मंदार चिकणे यांनी प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानले.आयोजनासाठी संस्थापक हरिष चिकणे,अध्यक्ष अभिनंदन थोरात,उपाध्यक्ष नारायण मुरकुटे,सचिव मिरा चिकणे-देशमुख,नाथाभाऊ कुदळे,मंदार चिकणे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

blank