28.1 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home शैक्षणिक राष्ट्रीय स्तरावर प्रोग्रेसिव्हच्या विद्यार्थ्याला स्वर्णपदक

राष्ट्रीय स्तरावर प्रोग्रेसिव्हच्या विद्यार्थ्याला स्वर्णपदक

0
44

गोंदिया,दि.12 : : श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह इंग्लिश शाळेच्या प्रतिभावान विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ठ प्रदर्शन करून शाळेचा नाव व संपूर्ण जिल्ह्याचे नाव गौरविले. ज्यामध्ये नंदिनी टेकाम व चेतन टेकाम यांनी अष्टेडू आखाडा स्पध्रेत जिल्हास्तर, विभागीय स्तरावर यश संपादित करून राष्ट्रीय स्तरावर आपली झेप घेऊन  ६५ वे राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा राजस्थान मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
या स्पध्रेतसुद्धा उत्कृष्ठ प्रदर्शन करून स्वर्ण पदक व कास्य पदक आपल्या नावे केले. धोलपुर राजस्थान येथे राष्ट्रीय क्रिडा प्रतियोगिता मध्ये भारतातील सर्व राज्यातून प्रतिभावान विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले होते. यात प्रोग्रेसिव्ह शाळेने स्वर्ण पदक आपल्या नावे करून एक यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार व प्रोग्रेसिव्हचे क्रिडा शिक्षकाला दिला. प्राचार्य ओ.टी.रहांगडाले, कुमुदिनी तवाडे, वाय.आशा राव, ज्योति पहिरे, विकास पटले, रूपकला रहांगडाले, प्रमोद वाडी, शिल्पा सिंग, स्मिता शुक्ला, राहुल रामटेके, दिव्यांशू जैस्वाल, हेमा नायडू, संगम बावनकर, पालेंद्र मेंढे, खुशबू बांगडकर, मुकेश शेंडे, डॉली गजभिये, प्रियंका भरणे, मंगला कटरे, रूपाली ऊके, सपना बावने ने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.