26.6 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home महाराष्ट्र वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

0
28

मुंबईदि. 13 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी राज्यसभेचे सदस्य शरद पवार, महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्यविधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवतउप सचिव विलास आठवलेश्रीमती मेघना तळेकरराजेश तारवीनागनाथ थिटेअध्यक्षांचे सचिव राजकुमार सागरअवर सचिव रविंद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.