कार्तिक पौर्णिम महोत्सव संपन्न
गोंदिया दि. 13 : : हिंदू संस्कृतीत सणांना महत्व आहे, सणांचे महत्व जोपासात समाजात एकता, सामाजिक सलोखा कायम राहणार, याचे भान प्रत्येकाने जोपासावे. कार्तिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. धार्मिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात एकोपा टिकून राहण्यास मदत मिळते. आणि अशा प्रकारच्या आयोजनाला नेहमीच आपला पाठिंबा आहे, असे प्रतिपादन गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.श्री सद्गुरूनाथ शांतिधाम संस्कार शिक्षण मंडळ ढाकणीच्या वतीने आयोजित कार्तिक महोत्सव कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कार्तिक पौर्णिमा सप्ताह व एकात्मिक विश्वशांती मानव कल्याणार्थ अखंड नामजप देव दिपावली सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात विविध कार्यक्रम घेण्यात आले. ८ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशीनिमित्त संत बांगळुबाबा यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून अखंडनाम जप सुरू करण्यात आले. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता आरती, सायंकाळी भजन व आरती, १० नोव्हेंबर रोजी सकाळी आरती व सायंकाळी भजन व आरती, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता दिपक पांडे महाराज यांच्या मार्गदर्शनात महामृत्यूजय यज्ञ, रात्री ८ वाजता हार्टफुलनेस कार्यक्रम व १२ नोव्हेंबर रोजी गुरूनानक जयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्याच दिवशी सकाळी ८ वाजता आरती व प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० वाजता महामृत्यूजंय यज्ञ आयोजित होते. तर दुपारी २ वाजता बानव संविधान उद्बबोधन कार्यक्रम संत बांगळुबाबा यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विनोदभाऊ अग्रवाल होते. दिप प्रज्वलक म्हणून आ.विजय रहांगडाले तर अतिथी म्हणून रेखलाल टेंभरे, वैâलाशचंद्र हरीणखेडे, नामदेव शहारे, बंडूभाऊ जोशी, दिलीप डोये आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, कार्तिक एकादशीनिमित्त घरोघरी तुळशी विवाह संपन्न होत आहे. काही ठिकाणी सामुहिक तुळशी विवाहाची कार्यक्रम आयोजित होत आहे. हे स्तुत्य बाब आहे. सामुहिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांचा वेळ व पैशाची बचत होते. तर समाजात एकोपा टिकून राहतो. क्षेत्रातील जनता सुख, समृध्दी व एकोप्याने रहावी, हेच आपले प्रयत्न आहे. या एकतेला कधीही भंग होऊ देणार नाही. जनतेच्या हितासाठी सर्वोतोपरी आपले सहकार्य राहणार असून त्यांच्या अडअडचणीत नेहमीच पाठीशी उभे राहणार, असेही आ.विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत बांबळुबाबा आश्रम, श्री सदगुरूनाथ शांती धाम संस्कार सिंचन मंडळ ढाकणीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





