26.6 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम

पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम

0
36

चंद्रपूर,दि.14ः- नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून मतदार यादीचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम १ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आला आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी दावे किंवा हरकती ९ डिसेंबर पयर्ंत दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.या कार्यक्रमाची जाहीर सूचना २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार असून २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान पदवीधर मतदारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. तरी १ नोव्हेंबर च्या किमान तीन वर्ष पूर्वी पदवी किंवा पदविका प्राप्त केलेल्या पात्र पदवीधर मतदारांची नावे प्रसिद्ध करण्यात येणार्‍या मतदार यादीत समाविष्ट झालेली नाही. अशा पदवीधर अर्जदारांनी मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना १८ मधील अर्ज जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्याकडे दाखल करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.