पवनी,दि.14ः-ऐतिहासिक सम्राट अशोककालीन पवनी नगरीतील गांधी भवन येथे निर्वाणस्थ भदन्त शासन रश्मी परिसरात स्मृतीशेष नारा शेंडे सभागृहात आणि डॉ. वा. ना. मेर्शाम प्रज्ञा मंचावर ८ डिसेंबर रोजी पहिले मुक्त प्रतिनिधी परिवर्तन साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनात विदर्भातून साहित्यिकांची उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक प्रा. विनोद मेश्राम तर उद्घाटक म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महिला आघाडी अध्यक्ष सुषमा भड तसेच स्वागताध्यक्ष नगराध्यक्षा पुनम काटखाये राहणार आहेत. संमेलनाला विलास गजभिये, संपादक मिलिंद फुलझेले, प्रा. भिमराव गायकवाड, शालिक जिल्हेकर, संजय गोडघाटे, सुजाता लोखंडे, सुनंदा जुलमे, लिलाधर गायकवाड, नागेश वाहुरवाध, रमेश गेडाम, सुधीर बाराहाते, सुषमा कळमकर, माया थोरात, संध्या राजूरकर, दयाराम राऊत, प्रभाकर रंगारी, विजय कळंबे, प्रकाश बावनकडे, प्रा. प्रमोद वासनिक, ह्रदयी चक्रधर, संदीप गायकवाड, सरिता सातर्डे, रिना गायकवाड, प्रा. शाम मोहरकर, राजू बोरकर, प्रा. सुरेश खोब्रागडे, इंजि. विजय मेर्शाम, प्रा. पुरण लोणारे, प्रा.भगवान सुखदेवे, प्रा. वामन शेळमाके, प्रियकला मेर्शाम, अपेक्षा अमिन दिवाण, भुषण भस्मे, प्रियदश्री खोब्रागडे, प्रा. प्रल्हाद गजबे, भुपेश वर्हाडे, मालती वर्हाडे, संजय सायरे, अँड. सोनिया गजभिये, धर्मेश पाटील, निखिलेश कांबळे यांचा सहभाग राहील.
पुस्तकांचे प्रकाशन, विविध साहित्यिकांना पुरस्कार, परिवर्तन जीवन पुरस्कार, कविसंमेलन, मुलाखत, परिसंवाद, एकपात्री नाटक असे संमेलनाचे स्वरूप आह.े.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक मनोहर मेर्शाम, स्वागत समिती सदस्य लक्ष्मीकांत तागडे, अशोक पारधी, प्रशांत पिसे, महादेव शिवरकर, अनिल धारगावे, अँड. सोनिया गजभिये, रमेश गेडाम, विनोद आटे, एकनाथ वैरागडे, रमेश लोणारे, मार्कंड गजघाटे, राजाराम गणवीर, राम भेंडारकर, न. प. उपाध्यक्षकमलाकर रायपूरकर, बंडू हटवार, नरेंद्र रामटेके, संतोष लांजेवार, अनिल मेर्शाम, पँथर अंबादे, सुनिल उपरीकर, सुरेखा जनबंधू, नामदेव सुरकर, ज्योती चव्हाण, वनिता कोटांगले, रंजना रहाटे, प्रा. चांगदेव भाजीखाये, शशांक आठल्ये, डॉ. राजेश गोडाणे, विणा गायकवाड, मिनाक्षी बोरकर, मयुरी राऊत, डॉ. विक्रम राखडे, भक्तराज गजभिये, अरविंद काकडे, मनोज शेंडे, बंडू चौधरी, कैलास जांभुळे आदींनी केले आहे.





