33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय शरद पवार आज विदर्भ दौर्‍यावर

शरद पवार आज विदर्भ दौर्‍यावर

0
36

blank

नागपूर : राज्यात सत्ता स्थापनेच्या झालेल्या हालचाली व त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १४ नोव्हेंबरला विदर्भाच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा राजकीय नसून परतीच्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी आहे. विदर्भात सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शरद पवार हे पूर्व विदर्भात पाहणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना भरीव मदत मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अगोदरपासूनच आग्रही भूमिकेत आहेत. यापूर्वीही शरद पवार यांनी मराठवाडा व महाराष्ट्राच्या इतर भागात बांधावर जाऊन शेतपिकाची पाहणी केली होती. १४ नोव्हेंबरला पीक पाहणीचा कार्यक्रम झाल्यानंतर १५ नोव्हेंबरला पवार हे नागपूर येथील कडबी चौकस्थित मेकोसाबाग शाळेच्या मैदानावर बिरसामुंडा जयंतीनिमित्त आदिवासी बचाव आंदोलनचे राष्ट्रीय संरक्षक सतीश पेंदाम यांच्या वतीने दुपारी २ वाजता आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

blank