गडचिरोली,दि.16: आधारभूत किंमत खरेदी योजना हंगाम 2019-20 मध्ये धान खरेदीस शासनाने जाहीर केलेल्या किंमतीनुसार पणन हंगाम 2019-20 करीता विकेंद्रीत खरेदी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अभिकर्ता संस्था- प्रादेशिक कार्यालय, आदिवासी विकास महामंडळ, गडचिरोली यांचे अंतर्गत 50 खरेदी केंद्रे, उपप्रादेशिक कार्यालय, अहेरी अंतर्गत 35 खरेदी केंद्रे तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशन लि. गडचिरोली यांचे अंतर्गत 13 खरेदी केंद्रे असून एकूण 98 खरेदी केंद्रांना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.गडचिरोली जिल्ह्यात प्रादेशिक कार्यालय (टि.डी.सी.), गडचिरोली यांचे अंतर्गत मंजूर केलेल्या धान खरेदी केंद्राची यादी पुढील प्रमाणे आहे.
तालुका- कोरची अंतर्गत खरेदी केंद्राचे नाव पुढील प्रमाणे आहे. कोरची, कोटरा, बेतकाठी, मर्केकसा, बेडगाव, बोरी, मसेली, कोटगुल .
तालुका-कुरखेडा अंतर्गत खरेदी केंद्राचे नाव- रामगड, पुराडा, मालेवाडा, येंगलखेडा, खेडेगाव, कुरखेडा, आंधळी, खरकाडा, गेवर्धा, नान्ही, गोठणगाव, सोनसरी, पलसगड, कढोली, शिरपुर (दे.), अंगारा, ऊराडी.
आरमोरी तालुक्याअंतर्गत- देलनवाडी, दवंडी, कुरुंडीमाल. तर वडसा तालुक्याअंतर्गत- पिंपळगाव व विहीरगाव असे आहेत.
गडचिरोली तालुक्याअंतर्गत- मौशीखांब व पोटेगाव. धानोरा तालुक्याअंतर्गत- रांगी, मुरुमगाव, धानोरा, दुधमाळा, कारवाफा, पेंढरी, मोहली, सोडे, चामोर्शी तालुक्याअंतर्गत- घोट, मक्केपल्ली, रेगडी, आमगाव, सोनापुर, गुंडापल्ली, भाडभिडी, अडयाळ, गिलगाव, मार्कंडा (कं)
गडचिरोली जिल्हयात उप-प्रादेशिक कार्यालय (टि.डी.सी.), अहेरी यांचे अंतर्गत मंजूर केलेल्या धान खरेदी केंद्राची यादी पुढील प्रमाणे आहे. अहेरी तालुक्यांतर्गत अहेरी, बोरी, कमलापूर, वेलगूर, इंदाराम, उमानुर, आलापल्ली, पेरमिली, देचलीपेळा तसेच मुलचेरा तालुक्यांतर्गत लगाम, मुलचेरा, सिरोंचा तालुक्यांतर्गत सिरोंचा, झिंगानूर, असरअल्ली, अमरादी, अंकीसा, वडधम, जाफ्राबाद, रोमपल्ली, बामणी, भामरागड तालुक्यांतर्गत भामरागड, लाहेरी, ताडगांव, कोठी, मन्नेराजाराम, एटापल्ली तालुक्यांतर्गत एटापल्ली, गट्टा, तोडसा, घोटसूर, कसनसूर, जारावंडी, गेदा, कोठमी, हालेवारा, उडेरा (बुर्गी) या गावांचा समावेश आहे.
जिल्हयात जिल्हा मार्केटिंग कार्यालय(ङिएम.ओ), गडचिरोली यांचे अंतर्गत मंजूर केलेल्या धान खरेदी केलेल्या केंद्राची यादी पुढील प्रमाणे आहे. चामोर्शी तालुक्यांतर्गत चामोर्शी, येणापूर, सुभाषग्राम, आष्टी, घोट, गडचिरोली तालुक्यातील गडचिरोली, आरमोरी तालुक्यातील आरमोरी, वैरागड, वडसा तालुक्यातील वडसा, मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर, मथुरानगर, सुंदरनगर आणि कुरखेडा तालुक्यातील विसोरा या गावांचा समावेश आहे.




