गडचिरोली,दि.16: 16 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे दिवाळी अंक प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन जगदीश म्हस्के माजी प्राचार्य व ग्रंथालय चळवळीतील गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी दिवाळी अंकाच्या प्रदर्शन कार्यक्रम साप्ताहिक विवेकचे जिल्हा प्रतिनिधी गजानन डोंगरे व श्री. यादव जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, गडचिरोली, प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी व कार्यालयातील कर्मचारी रा.बा.साठे, प्र.गो. राठोड याच्या प्रमुख उपस्थितीत झाले.उद्घाटन पर भाषण करतांना जगदीश म्हस्के म्हणाले दिवाळी अंक हे वाचकांसाठी मेजवानी आहे. सर्वांनी दिवाळी अंकाचा अस्वाद घ्यावा आणि दिवाळी अंक प्रदर्शन हे स्तूत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन केले. आभार प्रदर्शन रा.बा.साठे यांनी केले.





