25.1 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home राजकीय शेतकर्‍यांच्या धानाला २५00 रूपये भाव द्या-राष्ट्रवादीचे निवेदन

शेतकर्‍यांच्या धानाला २५00 रूपये भाव द्या-राष्ट्रवादीचे निवेदन

0
34

देवरी,दि.17ः- देवरी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून शेतकर्‍यांच्या विविध समस्येला घेवून आणि शेतकर्‍यांच्या धानाला प्रति क्विंटल २५00 रूपये हमी भाव देण्यात यावे. या प्रमुख मागणीला धरून देवरीचे उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी मार्फत राज्याचे महामहीम राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले.
सादर केलेल्या निवेदनात तालुक्यात यावर्षी जुलै ते ऑक्टोबरच्या कालावधीत आलेल्या अवकाळी पावसामुळे धान शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून यात शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच खरीपाची पिके सडून या पिकांवर किडीचा (खोडकिडा, मावा व तुडतुडा) प्रादुर्भाव ही मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. त्याचप्रमाणे राज्या पिक विमा योजना असली तरी देखील पिक विमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांना मदतीची कोणताही प्रतिसाद मिळत नाही.
तरी शेतकर्‍यांची नुकसानीची तातडीने चौकशी करून त्यांना आर्थिक मदत करावी आणि त्यांच्या धानाला प्रति क्विंटल २५00 रूपये हमी भाव व पिक विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावे. तसेच शेतकर्‍यांना रब्बीसाठी मोफत बी-बियाणे व खत त्वरित देण्यात यावे. त्याचप्रमाणे शेतकर्‍यांचे पिक कर्ज व विज बिल माफ करण्यात यावे आणि सहकारी धान खरेदी केंद्रावर बारदाना त्वरित उपलब्ध करून द्यावा व देवरीच्या एमआयडीसी मध्ये स्थानिक सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन सादर करणार्‍या शिष्टमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेता कृउबासचे सभापति रमेश ताराम, तालुकाध्यक्ष सी.के. बिसेन, गोपाल तिवारी, पारबताबाई चांदेवार, नगरसेवक नेमीचंद आंबलीकर, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, अर्चना ताराम, भैय्यालाल चांदेवार, दिलीप दुरूगकर, रविकांत बडवाईक, अनिल वालदे, मुन्ना अंसारी, धर्मेंद्र कांबळे, रामरतन करावत, अजय पांडे, दिलीप कुंभरे, मोहन निर्वाण, रंजन मेर्शाम, धर्मा मानकर, हिरालाल खोबा, मुकेश खोटेलेसह तालुक्यातील पक्ष कार्यकर्ता व शेतकरीबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.