26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ बालकांनी संरक्षणासाठी पोलीसांची मदत घ्यावी

बालकांनी संरक्षणासाठी पोलीसांची मदत घ्यावी

0
40

अर्जुनी मोरगावःबालकाचे वय १३ ते १९ हे संस्कारक्षम असते. या वयात मनावर संस्काराचे प्रतिqबब उमटत असते. या वयाला टिनेज म्हणतात. या वयातील बालकांवर काही असामाजिक तत्वामार्फत अनेक अत्याचार होत असतात. अल्पवयीन मुलांमुलींवर छेडछाड, पाठलाग व इतर अत्याचार होत असतात. मुलींनी यावेळी आपल्या संरक्षणासाठी पोलीस काका व पोलीस दिदी यांना भ्रमणध्वनीवरून कळवून त्यांची मदत घेतली पाहिजे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांनी केले. आदिवासीचे जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीचेऔचित्य साधून स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित बालकांचे ह्नक व सुरक्षीतता सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या पर्यवेक्षीका विणा नानोटी होत्या.

यावेळी मुकेश शेंडे, हरिदास गहाणे, प्रा.वाय.बुरडे, जुगलकिशोर राठी, लिना मिसर,छाया घाटे यांची उपस्थिती होती. महादेव तोंदले म्हणाले, अल्पवयीन मुलामुलींवर अत्याचार होत असतात त्यांच्या संरक्षणासाठी कायदे कलम आहेत. मदत व सहकार्यासाठी १०९८,१०३ हे क्रमांक आहेत. युनिसेफने दिलेल्या बालसंरक्षण ह्नकाला ३० वर्ष पूर्ण झाले आहेत. पोलीस संरक्षणासाठी पालक, मित्र, मार्गदर्शक अशाभूमिका पार पाडतात.बालकांना शिक्षण,आरोग्य, खेळ, कौशल्य शिक्षण,सहभाग,मतदान याबाबत मत मांडण्याचा अधिकार आहे. यावेळी माणिक खरकाटे यांनी वाहतुकीच्या नियामाविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कुंडलिक लोथे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयोचे प्रभारी प्रा.जे.डी.पठाण, महेश पालीवाल, माधुरी व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.