26.6 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home राजकीय साेनियांच्या भेटीत सत्तास्थापनेची चर्चा नाही – पवार

साेनियांच्या भेटीत सत्तास्थापनेची चर्चा नाही – पवार

0
19

नवी दिल्ली(विशेष प्रतिनिधी) – निवडणूक निकालाच्या २५ दिवसांनंतरही महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा गुंता सुटू शकलेला नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांच्यात चर्चेनंतर साेमवारी शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी सरकार स्थापनेच्या निर्णयावर शिक्कामाेर्तब हाेईल, अशी आशा हाेती. मात्र त्यावरही दाेन्ही नेत्यांनी पाणी फेरले. संसदेच्या अधिवेशनासाठी पवार साेमवारी दिल्लीत दाखल झाले. पत्रकारांनी सकाळीच त्यांना घेरले व ‘महाराष्ट्रात सत्तास्थापना कधी हाेणार?’ अशा प्रश्नांचा भडिमार केला. त्यावर पवारांनीही ‘हा प्रश्न भाजप-शिवसेनेला विचारा’ असे मिश्किलपणे सांगत पत्रकारांचीच विकेट घेतली. मात्र पवारांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात हाेते. सायंकाळी पवारांनी साेनिया गांधींच्या घरी जाऊन त्यांच्याशी ४५ मिनिटे चर्चा केली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बाेलताना पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची साेनियांना मी माहिती दिली. सरकार स्थापनेबाबत मात्र आमची चर्चा झाली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते याबाबत चर्चा करून आम्हाला कळवतील. आघाडीतील इतर मित्रपक्षांना नाराज न करता त्यांची मतेही विचारात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.’