
गोंदिया दि. २१ :: गोंदिया विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार विनोदअग्रवाल यांच्या हस्ते ३० लक्ष ५० हजार रुपयांच्या विविध विकास कार्यांचे भूमिपूजन नुकतेच ग्राम तांडा येथे पार पडले. सदर कामे वित्तीय वर्ष २०१८-१९ मध्ये विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आले होते. यात पुष्पाताई कटरे यांच्या घरापासून अंजनीकुमार येडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम (७ लक्ष ५० हजार रुपये), अशोकसिंह पवार यांच्या घरापासून भुरेसिंह गौतम यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता (५ लक्ष), स्व. कापसे कनिष्ठ महाविद्यालय तांडा ते गुलाब बघेले यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम (४ लक्ष), तिलकचंद रहांगडाले ते दुर्गा चौक पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम (३ लक्ष), राजेश शेंडे यांच्या घरापासून ते सोनुजी पटले यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता (२. लक्ष), तेजराम बोपचे यांच्या घरापासून तेरमेश टेंभरे यांच्या घरपर्यंत सिमेंट रस्ता (२ लक्ष ५० हजार), दुर्गा मंदिर शिवाटोला (तांडा) येथे सभा मंडप (३ लक्ष), शहिद गोवारी स्मारक बांधकाम तांडा (१ लक्ष ५० हजार), शहीद बिरसा मुंडा स्मारक बांधकाम तांडा (१ लक्ष ५० हजार) अशी विविध कामे या निधीतून करण्यात येणार आहे. तसेच ५ लक्ष रुपयांच्या निधीतून दुर्गा चौक येथील सभामंडपाचे लोकार्पण देखील यावेळी करण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भव्य विजय मिळवल्याबद्दल आमदार विनोदजी अग्रवाल यांचा भव्य सत्कार समारंभ शाल व श्रीफळ देऊन समस्त ग्राम तांडा तर्फे करण्यात आला. कार्यक्रमात मार्गदर्शन करत असताना अग्रवाल यांनी सांगितले की आता फक्त कार्यक्रमाचे भूमिपूजन करून त्यांना तसेच प्रलंबित ठेवण्याचे दिवस गेले आता भूमिपूजन झालेल्या कामांना पूर्णत्वास नेवून त्याचा नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी लोकार्पण सुद्धा होतील आणि त्याची सुरुवात ही आजच्या लोकार्पण सोहळ्यातून श्रीगणेशा आहे. मागील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाना प्राधान्य देवून मार्गी लावण्यात येईल. गावाचे गावपण जपून त्याचे सर्वांगीण विकास करण्याचा पुढील काही दिवसात विकास आराखडा तयार करण्यात येईल.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रा. प. तांडा चे सरपंच मुनेश रहांगडाले यांनी ग्राम पंचायतीच्या वतीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. श्रावणबाळ समिती व संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भावरावजी ऊके, सभापती श्रीमती शैलजाताई सोनवाने, भाजप शाखा तांडा अध्यक्ष सुरेन्द्र सिंह परिहारविशेष अतिथी म्हणून लाभले होते. चेतनसिंह परिहार, हसनसिंह (पोलीस पाटील), कुंजन रहांगडाले, गेंदलाल रहांगडाले, राजेंद्र रहांगडाले, शोकजी पवार, प्रमोद रहांगडाले, नुकचंद बीसेन, हंसराज राऊत, पुष्पाताई कटरे, मीराताई उईके, कस्तुराबाई येटरे, सरिताताई रहांगडाले, सुरेखाताई खांडेकर, रविभाऊ रहांगडाले, सुभाष दहाटकर, श्यामलाल रहांगडाले, तेजराम गौतम, निलेश रहांगडाले, शालीकरामजी बावनथडे, लक्ष्मणजी रहेकवार, हेमराजजी ठाकूर, विमलताई, निर्मलाताई पटले, धनवंताताई हरकंडे व समस्त ग्राम तांडा वासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




