गोंदिया,दि.21 नोव्हेंबरः– विद्यार्थ्यामध्ये भारतीय संविधानाचे महत्त्व रुजावे, संविधानाने त्यांना दिलेले अधिकार व हक्कांची जाणीव व्हावी, यासाठी २६ नोव्हेंबर संविधान साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून यावर्षी जिप सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने तीन गटांत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन जिप सभापती विश्वजित डोंगरे यांनी केले आहे.
या स्पर्धेच्या आयोजन व नियोजनासंदर्भात म्हणाले की, सभापती डोंगरे म्हणाले, देशाचे संविधान लोकशाहीचा कणा आहे.संविधानाने नागरिकांना त्यांचे अधिकार व हक्क मिळवून दिले आहेत. विद्यार्थ्यानाही संविधानाचे महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशाने यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या विषय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्याथ्र्यांकरिता निबंध स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले. या स्पर्धेच्या आयोजनासाठी समित्यांचे गठन करण्यात आले असून, समिती
सदस्यांना विविध जबाबदाèया देण्यात आल्या आहेत. तालुकास्तरावरील विद्यार्थ्यांना जवळ पडतील अशा शाळेत परीक्षा केंद्र ठरविण्याची जबाबदारी सर्व गटशिक्षणाधिकाèयांना
देण्यात आली आहे. गोंदिया तालुक्यात ४, तर इतर सात तालुक्यांत ३ परीक्षा केंद्रे राहणार आहेत. ज्या शाळेत परीक्षा केंद्र आहे, तेथे विद्याथ्र्यांसाठी बैठक व्यवस्था,पर्यवेक्षक, पिण्याचे पाणी आदी सोई करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना निबंध मराठी, हिंदी व इंग्रजी यापैकी एका भाषेतून देता येणार आहे. परीक्षेदरम्यान सर्व गटशिक्षणाधिकरी व गटविकास अधिकारी परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांनी आपल्या शाळेतील विद्याथ्र्यांना स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी करण्याचे आवाहन जिप सभापती विश्वजित डोंगरे यांनी केले आहे.
तीन गटांत होणार स्पर्धा
संविधान दिनी, २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते २ वाजतादरम्यान या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘अ ‘ गटातील इयत्ता पहिली ते आठवीसाठी ‘संविधान दिनामध्ये युवकांची भूमिका ‘ हा विषय असून, २०० शब्दमर्यादा आहे. ‘ब ‘ गटात इयत्ता नववी व दहावीसाठी ‘भारतीय संविधान मूलभूत कर्तव्ये व अधिकार ‘ हा विषय असून, ४०० शब्दमर्यादा व ‘क ‘गटात इयत्ता अकरावी व बारावीसाठी ‘लोकशाही संवर्धनात (रक्षणार्थ) भारतीय संविधानाचे महत्व‘ हा विषय असून ५०० शब्दमर्यादा आहे. तीनही गटांतील ही स्पर्धा प्रत्येकी २५ गुणांची राहणार आहे.





