24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ दिव्यांग व वयोवृध्दासाठी बसस्थानकावर 2 व्हिलचेअरची सुविधा

दिव्यांग व वयोवृध्दासाठी बसस्थानकावर 2 व्हिलचेअरची सुविधा

0
36

भंडारा, दि. 21 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भंडारा विभागातील   भंडारा स्थानकावर दिव्यांग व वयोवृध्द प्रवाशांसाठी व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सदर व्हिलचेअर सनफ्लॉग स्कूल वरठीचे प्राचार्यांच्या वतीने पुरविण्यात आले असून या व्हिलचेअर आज लोकार्पण करण्यात आले. दिव्यांग व वयोवृध्द प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भंडारा विभागातर्फे करण्यात आले आहे.19 नोव्हेंबर 2019 रोजी सनफ्लॉग स्कूल वरठीचे प्राचार्य राक्रिष्णा पांडे यांनी दोन व्हिलचेअर विभागीय वाहतुक अधिकारी चंद्रकांत वडस्कर व भंडारा आगाराचे व्यवस्थापक फाल्गुन राखडे यांना हस्तातंरीत केल्या. याप्रसंगी सहाय्यक वाहतुक निरिक्षक जयनारायण सुर्यवंशी, वाहतूक निरिक्षक विजय नंदागवळी, अविनाश गायधने, जाहीर पठाण तसेच बसस्थानकावरील कर्मचारी व प्रवाशी उपस्थित होते.