25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ रेशीम संचालक  यांची टसर रेशीमग्राम निष्टी येथे भेट

रेशीम संचालक  यांची टसर रेशीमग्राम निष्टी येथे भेट

0
91

 भंडारा, दि. 21 :- रेशीम संचालनालय नागपूरच्या संचालक भाग्यश्री बानायत यांनी नुकतीच भंडारा जिल्हयातील टसर रेशीम कोष उत्पादक कामकाजाची पाहणी केली. त्याकरीता त्यांनी भंडारा जिल्हयातील सर्वात जुने व जास्त लाभार्थी असलेल्या पवनी तालुक्यातील निष्टी येथे प्रत्यक्ष भेट ‍दिली. सदर भेटीत त्यांनी खाजगी टसर अंडीपूंज उत्पादक चंद्रकात सुधाकर डहारे व वामन सदाशीव डहारे यांचे खाजगी अंडीपूंज निर्मिती गृहाला भेट देवून टसर अंडीपूंज उत्पादन कामकाजाची पाहणी केली. तसेच निष्टी येथील ऐन वनक्षेत्राला भेट देवून चंद्रकांत सुधाकर डहारे व सुधाकर गंभीर डहारे यांचे टसर किटक संगोपनाची पाहणी केली.

निष्टी येथे नाविण्यपूर्ण योजने अंतर्गत टसर रेशीम कोष उत्पादकाकरीता टसर कोष, टसर धागा निर्मिती ते कापड निर्मीती प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पांतर्गत निष्टी येथे एक एकर शासकीय जागा उपलब्ध झाली असून तेथे टसर रेशीम मुलभूत सुविधा केंद्राचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकामाची पाहणी सुध्दा संचालकांनी केली. सदर कार्यक्रमात रेशीम संचालक बानायत यांचे हस्ते टसर रेशीम अळीचे खाद्यवृक्ष अर्जुन वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थीत टसर रेशीम कोष उत्पादक लाभार्थींशी सचांलकांनी संवाद साधला. टसर कोष उत्पादक लाभार्थींच्या वनक्षेत्रा विषयी अडचणी, अंडीपूंज दराचे अनुदान व रिलींग कोष दरा बाबतचे मागणी बाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे संचालकांनी सांगीतले. नाविण्यपूर्ण योजनेचा लाभ घेवून मोठया प्रमाणात टसर कोषापासून धागा निर्मिती करावी आणि गावातच रोजगार निर्मिती करावी, संचालनालय सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आवाहन त्यांनी उपस्थीत टसर कोष उत्पादक लाभार्थींना केले.

या प्रसंगी रेशीम उपसंचालक डी. ए. हाके, सहाय्यक रेशीम संचालक आर. टी. जोगदंड, , पी. जी. मदने रेशीम विकास अधिकारी रेशीम संचांलनालय, अनिल कुमार ढोले प्रभारी रेशीम विकास अधिकारी , भंडारा व जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा येथील कर्मचारी कदम, कळमकर, लोणारे,. लोहारे तसेच मोठया संख्येने रेशीम उत्पादक शेतकरी हजर होते. या प्रसंगी नैसर्गीक टसर किटक संगोपन कार्यक्रमाचे औपचारीक उदघाटन निष्टी येथील नैसर्गिक ऐन वनक्षेत्रात रेशीम संचालकांच्या हस्ते करण्यात आले. सन 2019-20 मध्ये भंडारा जिल्हयात 90 ते 95 हजार अंडीपूंजाचे वाटप करून 30 ते 35 लक्ष टसर कोषाचे उत्पादन करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्र. रेशीम विकास अधिकारी अनिलकुमार ढोले यांनी दिली.

blank