34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ शेलू-वाशिम मार्गावरील वाहतूक राजाकिन्ही-वाशिम मार्गाने वळविण्याचे आदेश

शेलू-वाशिम मार्गावरील वाहतूक राजाकिन्ही-वाशिम मार्गाने वळविण्याचे आदेश

0
37

वाशिम, दि. २१ : शेलू-वाशिम प्रमुख जिल्हा मार्ग १ या रस्त्याचे काम सुरु असून शेलू गावाकडून चिखली येथील राष्ट्रीय महामार्गापासून या रस्त्याची सुरुवात होते. सुरुवातीच्या ९ किलोमीटर लांबीत रस्त्याच्या धावपट्टीची रुंदी ३.७५ मीटर आहे. सद्यस्थितीत याठिकाणी सेंसर पेव्हर लावून डांबरीकरण करण्याचे नियोजित आहेत. सेंसर पेव्हरची रुंदी अंदाजे  ५ मीटर असल्याने काम सुरु असताना रस्त्यावरून इतर वाहतूक होणे शक्य नाही. तसेच हा रस्ता इको-सेन्सिटिव्ह झोनमधून जात असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी वळण रस्ता काढणे सुद्धा शक्य नाही. त्यामुळे शासन अधिसूचना एमव्हीए०५८९/सीआर-१०६१-टीआरए-२ दिनांक १९ मे १९९० एम.जी.जी.आयव्ही-ए दिनांक २० सप्टेंबर १९९० नुसार प्राप्त अधिकारानुसार मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ अन्वये शेलू-वाशिम प्रमुख जिल्हा मार्ग १ वरील वाहतूक तत्काळ बंद करून ही वाहतूक राजाकिन्ही-तोरणाळा-काटा-वाशिम प्रमुख जिल्हा मार्ग ३१ या मार्गावरून वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी दिले आहेत.

शेलूवाशिम मार्गावरील डांबरीकारणाचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक राजाकिन्ही-तोरणाळा-काटा-वाशिम या पर्यायी मार्गाने सुरु राहील. काम पूर्ण होताच वाहतूक मार्गात बदल करण्याचा आदेश रद्द होवून वाहतूक नेहमीप्रमाणे सुरु राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम १३१ अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

blank