25 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ चेतन गावंडे अमरावती महानगरपालिकेचे १६ वे महापौर

चेतन गावंडे अमरावती महानगरपालिकेचे १६ वे महापौर

0
38

अमरावती,दि.22 : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापालिकेच्या १६ व्या महापौर , उप महापौरपदाची आज हात उंचावून निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपची सदस्यसंख्या बहुमताला सापेक्ष राहिल्याने महापौरपदी चेतन गावंडे, तर उपमहापौरपदी कुसूम साहू यांची निवड झाली. त्यांना प्रत्येकी ४९ मते पडलीत. या निवडणुकीत शिवसेनेचे सदस्य तटस्थ राहिलेत. महाशिवआघाडाचा प्रयत्न फसल्याने काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार विलास इंगोले व प्रदीप हिवसे यांनी माघार घेतली. महापौरपदासाठी एमआयएमचे नगरसेवक हुसेन यांना २३ मते, बसपचे माला देवकर यांना ५ मते पडली.

blank