तिरोडा,दि.22:- तिरोडा विधानसभा मतदारसंघातील संग्रामपुर जलाशय शाखा एकोडीच्यावतीने खरीप हंगामाकरिता आक्टोंबर महिन्यात पाणी सोडण्यात आले.मात्र या हंगाम कालावधील लिकेज असलेला गेट बंद न करण्यात आल्याने मुख्य गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने तो पाणी शेतात जाऊन पिकाचे नुकसान झाले आहे.त्या नुकसानग्रस्त भागातील पिकाची पाहणी आमदार विजय रहागंडाले यांनी करुन संबधितांना त्वरीत नुकसानभरपाई संबधित विभागाने द्यावे असे निर्देश दिले.
महिनाभरापासून गेट लिकेज असल्यामुळे धामणेवाडा येथील शेतक-यांनी शेतात कापलेले धानाचे कळपे पाण्याखाली आल्याने जवळपास १०० हेक्टर जमिनीवरील धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचे घास हिरावले जाऊन आर्थिक संकट निर्माण झाले.अनेकवेळा संबधित विभागाशी संपर्क करुनही विभागाकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने शेतकर-यांनी आमदार विजय रहांगडाले यांच्याकडे धाव घेतली.आ.रहागंडाले यांनीही लगेच शेतपरिसराकडे धाव घेत पाहणी केली.आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याना चागंलेच धारेवर घेत या नुकसानीची पूर्ण जबाबदारी अधिका-यांची असल्याचे सांगत नुकसान भरपाईबाबत तलाठी, कृषी अधिकारी यांना त्वरीत पंचनामे करण्याचे निर्देश दिले.यावेळी प्रामुख्याने न.प.तिरोडा उपाध्यक्ष सुनील पालादुरकर ,जिल्हासचिव अजाबराव रीनाईत,महामंत्री सुरेश पटले,स्वानंद पारधी,अशोक रीनाईत, नामदेव बिसेन,शेतकरी खेमेंद्र तिडके,डॉ.सुरेश पारधी, राधेशाम बोपचे, राजकुमार बोपचे,पुरण बोपचे,राधेशाम बोपचे,किरण मेश्राम,शंकर चैधारी,टोलीराम सोनेवाने,उपसरपंच बाबा बिसेन व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.





