23.6 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home Top News विधीमंडळ नेतेपदावरून अजित पवारांची हकालपट्टी

विधीमंडळ नेतेपदावरून अजित पवारांची हकालपट्टी

0
25

मुंबई,दि.23 : महाराष्ट्राच्या राजकारणात आज सकाळीच आलेल्या भूकंपामुळे मोठे हादरे बसले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष याबाबींशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. अजित पवार यांनी कालच्या बैठकीच्या हजेरीच्या सह्यांचे पत्र नेले. त्याचा गैरवापर केला आणि शपथ घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतर आता सुत्रांकडून आलेल्या माहितीनुसार अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदावरून हटविण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

blank