23.6 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home Top News बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत

बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत

0
33

मुंबई,दि.23ः- राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना आज घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केले आहे.

काँग्रेसने यापुढंही शिवसेनेसोबत जाऊ नये. गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्यांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नव्हता, असे मतही संजय निरूपम यांनी व्यक्त केले.

जे काही घडले ते अनपेक्षित आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करतील, असे मत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

पार्टी अँड फॅमिली स्प्लिट असं व्हॉट्सअॅप स्टेटस खासदार सुप्रिया सुळे यांनी ठेवले आहे. त्यामुळे पवार कुटुबीयांमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवले आहे. पवार कुटुंबात फुट पडल्याचं त्यांनी याद्वारे म्हटलं आहे.पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे, असे स्टेटस सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅपवर ठेवलं आहे. त्यामुळे पवार कुटुंबीयांमध्ये आता फुट पडल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी जे काही केले त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचं सांगत तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे शरद पवार म्हणाले होते. दरम्यान, आपणही यापासून अनभिज्ञ असल्याचं म्हटलं होतं.

जनतेच्या हितेसाठी राज्याच्या प्रगतीसाठी सरकार स्थापन होणे आवश्यक होते. आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी आज सरकार स्थापन झाले. यापुढे निश्चित काम होईल. गोड बातमी येणार हे मी सांगत होतो, तेव्हा कोणत्याही कारणाशिवाय मी सांगत नव्हतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीचा अर्थ तुम्हीच समजा वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
blank