26.9 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ आरक्षित जागेवर निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा

आरक्षित जागेवर निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा

0
33

वाशिम, दि. २६ : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत ६ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने १९ नोव्हेंबर २०१९ रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार १८ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०१९ दरम्यान नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार असून ७ जानेवारी २०२० रोजी मतदान व ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या २० सप्टेंबर २०१९ रोजीच्या राजपत्र असाधारण क्रमांक ५४ अध्यादेश क्रमांक मधील प्रकरण तीन मुद्दा क्र. ४ मधील (एक) व (दोन) मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार, आरक्षित जागेवर अथवा पदावर निवडणूक लढविणाऱ्या, नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे जातप्रमाणपत्र पडताळणीकामीचे प्रस्ताव किंवा अर्ज संबंधित पडताळणी समिती कार्यालयाचे संशोधन अधिकारी यांच्याकडे सादर केल्याची पोहोच अथवा पुरावा नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाची असल्याने, याकरिता संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. तरी निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.