
अर्जुनी मोर,दि.29ःस्वदेशी खेळोत्तजक मंडळाचे वतीने घेण्यात येणा-या शालेय क्रिडास्पर्धा या मधे शिक्षकांना होणारा त्रास लक्षात घेता तालुक्यातील बाकटी केंद्रातील शिक्षकांनी या क्रिडास्पर्धा वरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत 28 नोव्हेंबर रोजी केंद्र-बाकटी तर्फे स्वदेशी खेळोतेजक मंडळ बाकटी तर्फे नवीन कार्यकारिणी गठीत करणे,आणि खेळाच्या आयोजनासाठी बोलाविण्यात आलेल्या सभेत सर्व शिक्षकांनी स्वदेशी मंडळाच्या खेळांवर बहिष्कार घातला.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार मागील वर्षीचे संपकालीन तीन दिवसाचे वेतन अदा करण्यात आले नाही. -खेळात विद्यार्थांचे होणारे अपघात,दुखापत याची जबाबदारी कुणीही घेत नाही. -विद्यार्थ्यांना ने आन करतांना होणारे अपघात,शिक्षकांना शिवीगाळ, मानहानी,,आणि खेळातून विद्यार्थ्यांना 0%गुणात्मक लाभ या सर्व गोष्टींचा विचार करता उपस्थित बाकटी केंद्रातील सर्व शिक्षकांनी एकमुखाने तसेच स्वाक्षरीचे निवेदन बाकटी केंद्राचे केंद्राध्यक्ष ओ.जे.वासनिक, आणी कार्यवाह श्री नागोशे यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी एस.एम.शेंडे,संग्रामे सर,नरेश लंजे,वासनिक सर,गेडाम सर,टेंभुर्णे सर आणी बाकटी केंद्रातील 38 शिक्षक उपस्थित होते. तसेच जोपर्यंत संपकाळातील तिन दिवसाचे वेतन मिळनार नाही.तोपर्यंत स्वदेशी खेळोत्तजक मंडळाच्या कोणत्याही कार्यवाहीत कुणीही सहभाग घेणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.





