25.3 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ कडीकसा येथे १३ शेतकर्‍यांचे पुंजणे जाळले

कडीकसा येथे १३ शेतकर्‍यांचे पुंजणे जाळले

0
38

देवरी,दि.30ः तालुक्यात शेतकर्‍यांचे धान पिकांचे पुंजणे जाळण्याचे सत्र सातत्याने तीन दिवसांपासून सुरू असून २६ व २७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चिचगड येथे धानाचे पुंजणे जाळल्यानंतर पुन्हा २८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री कडीकसा या एकाच गावातील १३ शेतकर्‍यांच्या धानाचे पुंजणे जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे.यामुळे अंदाजडे १५.२५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे वर्तविण्यात येत आहे.
तलाठी साजा-१४ अंतर्गत ग्राम कडीकसा येथे २३.0९ एकरातील पिकांच्या पुंजण्यांना २८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री आग लागली. यात शेतकरी दाऊसिंग नवलसाय हलमत, रासो परदेशी ताराम, छन्नो शामलाल कुंभरे, सुमोबाई बुद्धूलाल घावडे, भानुराम साधू गुरूपंच, मुन्ना दर्याव कुंभरे, दशरथ अमरू घावडे, चमली सुद्धू ताराम, चैतराम कांडेराम हलामी, प्रकाश बुधराम बोगा, माहू नवलसाय हलामी, नारायण पोदू टेंभुर्णे व छगन शिवा अहामी या १३ शेतकर्‍यांचा समावेश आहे. त्यांच्या नुकसानीचे एकूण क्षेत्र २३.0९ असून एकूण १५ लाख २५ हजार ३२६ रूपयांचे नुकसान झाले आहे.याबाबतचे निवेदन चिचगड येथील अप्पर तहसीलदारांना २९ नोव्हेंबर रोजी देण्यात आले आहे. शेतकरी सुनीलकुमार तुकाराम वालके यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यत चिचगड महसूल मंडळातील भागी, चिचगड, मोहाडी-रेहडी, डोंगरगाव, पाऊलदौना, गणुटोला, कडीकसा या गावांतील शेतकर्‍यांनी मळणीसाठी शेतशिवारात ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याला अज्ञात इसमांनी आग लावल्यामुळे जवळपास ७0 ते ८0 शेतकर्‍यांचे धान आगीत खाक झाले आहेत.