मनोहर चंद्रिकापुरे होणार पालकमंत्री
गोंदिया,दि.३०ः~ गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंना पराभूत करणारे राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नाना पटोले हे मंत्री होऊन दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री होतील अशी चर्चा होती.मात्र प्रफुल पटेलांनी राजकिय खेळी खेळत काँग्रेसकडून पटोलेंचे नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी पुढे केल्याने पालकमंत्री होण्याचे स्वप्न अर्धवट राहिले.तर चंद्रिकापूरेंचा राज्यंंमत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पटोले सभागृहात राहिले असते तर आपल्या शैलीत विरोधी पक्ष नेत्यालाही धारेवर धरू शकले असते ही गोष्ट लक्षात घेत भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्याशी संधान साधत कॅबिनेटमंत्री एैवजी अध्यक्षपदासाठी निवड होणे हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचे बोलले जात आहे.




