24.6 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home महाराष्ट्र पटोले होणार विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार,आज दुपारी विश्वासदर्शक ठराव

पटोले होणार विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार,आज दुपारी विश्वासदर्शक ठराव

0
34

मुंबई,दि.30ः- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव शनिवारी (दि. ३०) विधानसभेत मांडला जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. शनिवारी दुपारी सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार असल्याने ठाकरे सरकारची ही पहिलीवहिली परीक्षा असणार आहे.त्यातच अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण,अशोक चव्हाण यांच्या नावाला विरोध केल्यानंतर साकोलीचे आमदार नाना पटोले यांच्या नावाला अध्यक्षपदासाठी होकार दिला आहे.पटोलेंना अध्यक्षपदाचे उमेदवार जाहिर करुन राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी पटोलेंचा भंडारा-गोंदियातील राजीकय हस्तक्षेपावर निर्बंध घातल्याचेही बोलले जात आहे.या पदासाठी उद्या सोमवारला निवडणुक होणार असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पटोलेंच्या नावाची घोषणा केली.

विधानसभेत शनिवारी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारबाबत विश्वासदर्शक ठराव शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मांडणार आहेत. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या धोरणाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषण करतील. नंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड होईल, अशी माहिती महाराष्ट्र विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.