गोंदिया,दि.01–जिल्ह्यातील चार नगरपंचायतीमध्ये विषय समिती सभापती पदाचा कार्यकाळ संपल्याने ३0 नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पडल्या. यात देवरी, अर्जुनी मोर, गोरेगाव व सडक अर्जुनी नगर पंचायतीचा समावेश आहे.
देवरी : या नगर पंचायतीमध्ये पाणी पुरवठा सभापती पदी आफताब शेख, बांधकाम समिती सभापती पदी रितेश कुमार अग्रवाल, अर्थ व नियोजन सभापती पदी प्रवीण दहीकर व महिला बालकल्याण सभापती पदावर मायाताई निर्वाण यांची निवड झाली आहे.
अर्जुनी मोर : अर्जुनी मोरगावची निवडणूक प्रचंड गदारोळात झाली. यात बांधकाम सभापती पदावर भाजपचे मुकेश जायस्वाल, तर महिला बालकल्याण समिती सभापती पदावर कॉंग्रेसच्या वंदना सहारे यांची निवड झाली.
सडक अर्जुनी : सडक अर्जुनी नगर पंचायतीच्या निवडणूकीत पाणी पुरवठा सभापती पदी प्रियंका उजवणे, बांधकाम सभापती दिनेश अग्रवाल, महिला बालकल्याण सभापती पदावर ताराबाई मडावी व स्वच्छता समिती सभापती पदावर अभय राऊत यांची निवड झाली.
गोरेगाव : गोरेगाव नगर पंचायतीमध्ये तीन सभापतीसाठी निवडणूक घेण्यात आली. यात दोन सभापती निर्विरोध निवडून आले. पाणी पुरवठा सभापती पदी भाजपचे भुमेश्वर येल्ले व महिला बालकल्याण सभापती पदावर नगर विकास आघाडीच्या रोशनी टेंभुर्णीकर यांची निर्विरोध निवड झाली. तर बांधकाम सभापती पदावर भाजपचे रेवेंद्र बिसेन निवडून आले. सर्व नगर पंचायत विषय समिती सभापती यांच्या निवडीबद्दल पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.





