दिवाबत्तीच्या कनेक्शन वर चालतोय ग्राम पंचायतीची वीज
सालेकसा,दि.03ः तालुक्यातील कावराबांध ग्रामपंचायत इथे एक वेगळाच प्रकार बघायला मिळत आहे, ज्या अर्थी गावात दिवाबत्तीची सोय करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीकडे असते त्याच ठिकाणी ग्रामपंचायत दिवाबत्ती च्या खर्चात स्वतःच विजेचे कनेक्शन भागवत आहे असे निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायत कावराबांध येथील इमारत ही गावात पथदिव्यांना पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या कनेक्शन मध्ये ग्राम पंचायतीचे इमारत वीज पुरवठा करत आहे. ग्रामस्थांनी याबाबद माहिती मिळताच तात्काळ ते बंद करून ग्राम पंचायतीच्या मीटर वर विजेचा पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. गावातील दिवाबत्तीचा खर्च गावकर्यांना दिवाबत्ती कर स्वरूपात भरावा लागतो. त्यामुळे ग्राम पंचायतीला विजेचा बिल गावकऱ्यांनी का भराव असा सवाल गावकरी विचारत आहेत. जर शेतच कुंपण खाईल तर विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
माझ्या माहितीनुसार सौरऊर्जा वापरून कार्यालयाची इमारत विजेची पूर्तता करते, वीज कनेक्शन बद्दल मला माहिती नाही, तरीही मी चौकशी करून योग्य कार्यवाही करतो.
– श्री. सिंदूरकर ,ग्राम सेवक ग्रा.प. कावराबांध
विजेची चोरी ग्राम पंचायत मागील २ ते ३ वर्षांपासून करत आहे पण आमच्या निदर्शनास येता बरोबर संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून ते कनेक्शन बंद करायला लावले.
– रोहित बनोठे,सामाजिक कार्यकर्ते ग्रा. प. कावराबांध
गावकऱ्यांच्या तक्रारीवरून ग्रा. प.येथे भेट दिली असता दिवाबत्तीच्या मीटर वरून ग्रा. प. इमारतीत वीज पुरवठा केला जात असल्याचे आढळून आले होते. त्या अनुषंगाने कार्यवाही करत सदर मीटर दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले.
– श्री. लांजेवार ,कनिष्ठ तंत्रज्ञ ,महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ





