30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ विभागीय तपासणी समितीकडून भागी, सिरेगावबांध ग्रामपंचायतीची तपासणी

विभागीय तपासणी समितीकडून भागी, सिरेगावबांध ग्रामपंचायतीची तपासणी

0
43

गोंदिया,दि.03 – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन 2018-19 मध्ये जिल्हय़ातून प्रथम व व्दितीय आलेल्या ग्रामपंचायतींची तपासणी नुकतीच विभागीय तपासणी समितीच्या वतीने करण्यात आली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन 2018-19 या वर्षांत गोंदिया जिल्ह्य़ातील भागी या ग्रामपंचायतीने प्रथम, सिरेगावबांध या ग्रामपंचायतीने व्दितीय तर सटवा या ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकाविला होता. यापैकी प्रथम क्रमांक भागी व द्वितीय क्रमांक असलेल्या सिरेगावबांध ग्रामपंचायत या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या होत्या. त्या अनुषंगाने विभागीय तपासणी समितीने दिनांक 29 नोव्हेंबर रोजी या ग्रामपंचायतींना भेटी परिशिष्ट 2 नुसार तपासणी केली. सदर तपासणी समिती अध्यक्ष तसेच उपायुक्त आस्थापना अंकुश केदार यांच्या नेतृत्वाखाली समिती सचिव तसेच उपायुक्त विकास सुनील निकम, सहायक संचालक माहिती संचालनालय नागपूरचे अनिल गडेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूरचे उपअभियंता मनोज केंदळे, नागपूर विभागीय कार्यालय उपअभियंता जलस्वराज्य अरुण पोहणे, विभागीय कार्यालय नागपूर विकास शाखेचे विस्तार अधिकारी पंचायत छत्रपाल पटले यांनी केली. तपासणी दरम्यान जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद गोंदियाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आर. व्ही. राठोड, गटविकास अधिकारी देवरी मनोज हिरूडकर, गटविकास अधिकारी अर्जुनी मोरगाव मयूर आंदेलवाड, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्ष गोंदियाचे समन्वयक भागचंद्र रहांगडाले, मुकेश त्रिपाठी, बालकिशोर पटले, विस्तार अधिकारी पंचायत पराते, विस्तार अधिकारी झामरे, विस्तार अधिकारी वलथरे, विस्तार अधिकारी अनुप भावे आदी उपस्थित होते. विभागीय स्पर्धेत सहा जिल्हय़ातील 12 ग्रामपंचायतीं मध्ये स्पर्धा आहे.