- 5 रोजी एक दिवसीय उद्योजकता शिबीर
भंडारा दि. 4 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत जिल्हयातील अनुसूचित जातीच्या युवक, युवतीकरीता 18 दिवसीय निशुल्क निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन उद्योग संचालनालय, उद्योग विभाग, मुंबई व मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरींग सर्व्हिसेस लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य व निवासी स्वरुपाचे असून यामध्ये शासनाच्या विविध योजना, व्यक्तीमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगसंबंधी विपनन कौशल्य, हिशोब ठेवण्याची पध्दत, व्यवस्थापनाचे विविध प्रकार, बाजारपेठ पाहणी व पॅकेजिंग इत्यादी विषयांवर तज्ञ व अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल.
उत्कृष्ट प्रशिक्षणाद्वारे यशस्वी बनविणे व स्वयंरोजगाराकरीता अनुसूचित जातीच्या युवक युवतींना प्रोत्साहित करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. सदर कार्यक्रमाची माहिती देण्याकरीता एक दिवसीय उद्योजकता विकास शिबीर 5 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, भंडारा येथे मुलाखत घेण्यात येईल. प्रत्यक्ष मुलाखतीतून 40 प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येईल.अधिक माहितीकरीता विजय सेलोकर, सहाय्यक विभागीय व्यवस्थापक, मिटकॉन भंडारा द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, प्रशासकीय इमारत भंडारा 9423413738,8669139438 वर संपर्क साधावा.





