25 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home राजकीय विधानसभा अध्यक्ष पटोलेंचा रविवारला गोंदियात नागरी सत्कार

विधानसभा अध्यक्ष पटोलेंचा रविवारला गोंदियात नागरी सत्कार

0
119

गोंदिया,दि.05ः नागरिक सत्कार समिती भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्यावतीने 8डिसेंबर 2019 रविवारला दुपारी 2.00 वाजता महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नानाभाऊ पटोले व गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांचा नागरिक सत्कार समारंभ सुभाष शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यसभेचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल राहणार आहेत.सत्कार मूर्तिमध्ये  महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले,आमदार मनोहर चन्द्रिकापुरे,आमदार सहेसराम कोरोटे,आमदार नरेन्द्र भोंडेकर,आमदार विजय रहांगडाले,आमदार विनोद अग्रवाल व आमदार राजू कारेमोरे यांचा समावेश आहे.या नागरी सत्कार कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.