24.5 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ 2515 सह तिर्थस्थळाच्या विकास निधी कामांना सरकारची स्थगिती

2515 सह तिर्थस्थळाच्या विकास निधी कामांना सरकारची स्थगिती

0
70

गोंदिया,दि.05ःराज्याच्या तिजोरीत असलेला खळखळाट त्यातच वाढता खर्च बघून बहुतांश विकास कामाना स्थगिती देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.त्याअंतर्गतच ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फेत राबविण्यात येत असलेल्या 2515-1238,कोकण पर्यटन विकासनिधी तसेच ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्र विकासासाठी देण्यात आलेल्या निधीच्या खर्चावर स्थगिती देण्याचा निर्णय 4 डिसेंबर रोजी घेतला गेला आहे.संबधित विभागाने या योजनेंतर्गत असलेल्या कामाची सध्यास्थितीची माहिती आज गुरुवार 5 डिसेंबरच्या 5 वाजेपर्यंत मागविल्याने जिल्हा परिषदांच्या बांधकाम विभागात याचा ताळमेळ जमविण्याची लगबग दिसून आली.या योजनेंतर्गत 2  कोटी ते 25 कोटी रुपयापर्यंतच्या कामांना अद्याप कार्यारंभ आदेश न देण्यात आलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.त्यामुळे बहुतांश जिल्हा परिषद व विभागात त्यासाठी आजच्या तारखेत किंवा मागच्या तारखेत कार्यारंभ आदेश देऊन तो निधी वाचविण्याची धळपळ दिसून येत आहे.वास्तविक बघितल्यास या निधीचे गोंदिया जिल्हा परिषदेतही नियोजन झाले होते.जिल्ह्यातील प्रत्येक आमदारांनी किमान 2 ते 2.50 कोटीचे कामे मंजुर केली होती अशी सुमारे 10-15 कोटीची कामे 2515 मध्ये तर 15-20 कोटी रुपये तिर्थस्थळाच्या विकासासाठी होता.या निर्णयामुळे गोंदिया जिल्हापरिषदेतील अर्धा निधीवर स्थगीती येण्याची वेळ असून ती टाळण्यासाठी बांधकाम विभागात नियोजनाचा ताळमेळ बसविले जात असल्याचे दिसून आले.