24.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ ‘संवादिनी’ करत आहेत शासकीय योजनांची प्रसिद्धी

‘संवादिनी’ करत आहेत शासकीय योजनांची प्रसिद्धी

0
27

 गडचिरोली,दि.9: शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठीच्या दृष्टीने ‘संवादिनी’ हा उपक्रम राज्यात राबविला जात आहे. जिल्ह्यातील प्रतिनिधीक संवादिनींना आज संवादिनी कीट वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी टी.एस.तिडके, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ, सहा. नियोजन अधिकारी सागर पाटील, लेखाधिकारी मनोज कंगाले, अनुलोमचे जिल्हा समन्वयक संदिप लांजेवार, शेशू कोहळे उपस्थित होते.जिल्ह्यातील संवादिनी म्हणून निवडलेल्या 90 महिला इतर महिलांना भेटून शासनाच्या योजनांची माहिती देणार आहेत. हा उपक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई यांचे मार्फत सुरु आहे.