25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ महाराष्ट्रीयन कुणबी महासंघाच्या वतीने विधानसभाध्यक्ष पटोलेंचा सत्कार

महाराष्ट्रीयन कुणबी महासंघाच्या वतीने विधानसभाध्यक्ष पटोलेंचा सत्कार

0
37

गोंदिया,दि.10ः- भंडारा-गोंदिया जिल्हा नागरीक सत्कार समारहो समितीच्यावतीने 8 डिसेंबरला महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा नागरिक सत्कार खासदार प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी आरपीआय अध्यक्ष राजेन्द्र गवई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोलेंचा महाराष्ट्रीय कुणबी महासंघाचे गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर दोनोडे, भूषण फुंडे, चंद्रकुमार चुटे, भुमेश्वर मेंढे, डॉ. संजय देशमुख , राजू काळे , देवराज खोटेले , उषाताई मेंढे, लताताई दोनोडे, कुंदाताई दोनोडे, वंदनाताई काळे, कल्पनाताई बहेकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या नागरिक सत्कार कार्यक्रमात आमदार मनोहर चन्द्रिकापुरे, आमदार सहेसराम कोरोटे,आमदार नरेन्द्र भोंडेकर,आमदार विजय रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल,आमदार राजू कारेमोरे यांच्या पण नागरिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन माजी आमदार राजेन्द्र जैन व गंगाधर परशुरामकर यांनी केले.