अर्जुनी मोरगाव,दि.10-तालुका अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असतानाही विद्युत विभागाच्यावतीने वारंवार भारनियमन करुन नागरिकांना तसेच कृषीपंप धारकांना वेठीस धरत असल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडे धाव घेत,विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.त्या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करीत आमदार चंद्रिकापुरेंनीही नागरिकांना सोबत घेत गोंदियातील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात धाव घेत चर्चा केली.विद्युत भारनियमनामुळे सिंचनासाठी शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रब्बी पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केल्याने पिकाला पाणी देण्यासाठी कृषीपंपाला विजपुरवठा हवा मात्र भारनियमनामुळे विद्युत पुरवठा मिळत नसल्याने शेतातील पिकाला पाणी तरी कसे द्यावे अशा प्रश्नच कार्यकारी अभियंतासमोर माडंला गेला.त्यावर कार्याकारी अभियंता यांनी भारनियमनावर नियंत्रण करण्याचे आश्वास देत नागरिकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे.यावेळी दुर्योधन मैंद,मार्तंड झोडे, मोहन ठाकरे, यादोराव गहाणे, सचिन झोडे, कारुजी ठाकरे, शेषराव ठाकरे, प्रेमदास गहाणे, रेशीम झोडे हे शेतकरी उपस्थित होते.





