गोरेगाव,दि.10: मतदार संघातील नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असुन समाजाला हवी असलेली मदत उपलब्ध करुन विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. तसेच समाजाला आर्थिक व राजकीय दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकार्य करू असे विचार खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले. ते तालुक्यातील डव्वा (सटवा) येथे आदिवासी गोवारी /गोंड जमात समितीच्या वतीने आयोजित शहिद गोवारी स्मारक व क्रांती सुर्य बिरसा मुंडा स्मारक भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाला आमदार विजयभाऊ रहांगडाले, जिल्हा बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, जि.प.सदस्य रोहिणीताई वरखडे,चित्ररेखा चौधरी,पं.स.सदस्य पुष्पराज जनबंधु, उपसरपंच डॉ.पेमेंद्र कटरे, पोलीस पाटील ब्रम्हस्वरुप गजभिये व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.यावेळी गोवारी समाजाचे गोकुल बोपचे, मनोज नेवारे, भुवनेश ठाकरे, कोहळे, नंदलाल सोनवाने, सुरेश नेवारे, गोपीचंद शेंदरे यांनी समाज प्रबोधन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता दिनेश शहारे, भरत बोपचे, टिलकचंद शहारे, राकेश राऊत, नंदकिशोर राऊत, विक्की राऊत, राजू नेवारे, यादोराव कुंभरे, लीलाधर बोपचे, राजेश टेकाम, महेंद्र बोपचे, बुटन राऊत, राजु नेवारे व सर्व गोवारी /गोंड समाज बांधवांनी सहकार्य केले.





