
Ø भंडारा तालुक्यात बेला व मोहाडी तालुक्यात जांब
भंडारा, दि.11 : एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 12 डिसेंबर 2019 रोजी वैश्विक आरोग्य संरक्षण दिवसाचे औचित्य साधून राज्यात जिल्हास्तरावर महाआरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. सदर आरोग्य शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व योजनेबाबत अधिकची माहिती जाणून घ्यावी,असे आवाहन राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई यांचेकडून करण्यात येत आहे.
जिल्हयात योजनेतील नोंदणीकृत रुग्णालयाद्वारे सदर मोफत शिबीराचे आयोजन भंडारा तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालय सभागृह, बेला व मोहाडी तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र जांब या दोन ठिकाणी 12 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. या आरोग्य शिबीराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद मोटघरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. संजय गटकुळ यांनी केले आहे.



