तिरोडा,दि.14:-येथील नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात आमदार विजय रहांगडालेंच्या माध्यमातून ११० कोटी रुपयाचे विकास कामे प्रगतीपथावर असून शहरातून हायब्रीड NUT अंतर्गत वडेगाव गुलाबटोला तिरोडा खैरलांजी रस्त्याचे बांधकाम शहरातून सुरु असून या रस्त्याचा आढावा आमदार विजय रहांगडाले यांनी घेतला.यावेळी नगराध्यक्षासह कंत्राटदार,कार्य.अभियंतांना सोबत घेत कामाच्या स्थळी भेटी दिल्या. शहरातील अतिक्रमण व रस्ते बांधकाम सुरु असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्याकरिता मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत असून वाहतुकीची कोंडी होत असते. यावर उपाय काढून रस्त्यांचे काम जलदगतीने करण्याबाबत आमदार रहागंडालेनी आदेश दिले. यावेळी अध्यक्षा सोनाली देशपांडे,उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर,बांधकाम सभापती विजय बन्सोड, न.प.सदस्य अजय गौर,नरेश कुंभारे,राजेश गुणेरिया,जिब्राइल खा पठाण,विजय बुराडे,जगदीश कटरे,श्वेता मानकर,राखी गुनेरीया,अनिता अरोरा,ममता हटेवार,किरण डहाटे,रश्मी बुराडे,भावना चवळे,देवेन्द्र तिवारी, कार्य.अभियंता जावेद, कंत्राटदार अतूल डोर्लीकर,कार्य.उपभीयंता बावनकुडे, मुख्याधिकारी विजय देशमुख उपस्थित होते.





