33.9 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ जिल्ह्यातील १,९०० अंगणवाड्या झाल्या डिजिटल

जिल्ह्यातील १,९०० अंगणवाड्या झाल्या डिजिटल

0
29

गोंदिया,दि.16ः -अंगणवाडी सेविका मोबाईलच्या माध्यमातून अंगणवाडीतील कामे ऑनलाईन पद्धतीने करीत असून,शासनाला लागणारी माहिती ऑनलाईन अद्ययावत करीत आहेत.याअंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ९०० अंगणवाड्या डिजिटल झाल्या आहेत.या अंगणवाडी सेविकांना मोबाईल अ‍ॅपद्वारे बिट स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले असून, मोबाईल बिलापोटी शासनाकडून प्रत्येक तीन महिन्यांनी ४०० रुपये अंगणवाडी सेविकांना दिले जात आहेत.तंत्रज्ञानाच्या युगात शासकीय कार्यालयांतील कामकाज ऑनलाईन पद्धतीने व्हावे, एका क्लिकवर विभागाची माहिती मिळावी, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार अनेक शासकीय विभाग ऑनलाईनच्या वाटेवर असून अनेक विभाग डिजिटल झाले आहेत.त्यात अंगणवाडी केंद्रांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील १ हजार ९०० अंगणवाडी केंद्रे शासनाच्या डिजिटल संकल्पनेला अनुसरून ऑनलाईन झाले आहेत. यापूर्वी अंगणवाडीतील कामकाज रजिस्टर, नोंदवहीप्रमाणे चालत असे. अंगणवाडी सेविका,स्वयंसेविकांना गृहभेट, समुदाय आधारित कार्यक्रम, ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता, टीएचआर वाटप आदी विविध कामांची रजिस्टरवर नोंद करून तशी माहिती शासनाला सादर करावी लागत होती. मात्र, ही कामे आता ऑनलाईन पद्धतीने केली जात असून अंगणवाडी सेविकांसाठी सोईचे झाले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी व शहरी भागातील १ हजार ९०० केंद्रांतील अंगणवाडी सेविकांना मोबाईल संच वाटप करण्यात आले आहेत. मोबाईल अ‍ॅपचे बिटस्तरीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांतील माहितीद्वारे मूल्यमापन केले जात आहे. मुख्यसेविकेला बिट स्तरावर
सर्व सेविकांच्या कामांचे मूल्यमापन करायचे असल्याने मुख्य सेविका आपल्या अधिनस्त असलेल्या अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन माहिती भरण्याकरिता प्रोत्साहित करतात. अंगणवाडी सेविकांना वाटप करण्यात आलेल्या मोबाईल बिलापोटी शासनाकडून प्रत्येक तीन महिन्यांनी ४०० रुपये अंगणवाडी सेविकांना दिले जात आहेत.योजनेतील महत्त्वाचा दुवा अंगणवाडी सेविका केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर असते. या यंत्रणेतील एक भाग हा अंगणवाडी सेविका व मदतनीस आहेत.शासनाच्या अनेक योजनांची ग्रामीण भागात प्रचार-प्रसिद्धी, माहिती संकलन व योजनेची अंमलबजावणी आदी कामे त्यांना प्रामुख्याने करावी
लागतात. त्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या ग्रामीण क्षेत्रासाठी त्याचे महत्त्व अधोरेखित होते. असे असतानाही त्या तुटपुंज्या मानधनावर कर्तव्य जोख बजावतात. आज प्रत्येक क्षेत्र
डिजिटल होत असताना या अंगणवाडी सेविकांनी जिल्ह्यातील १हजार ९०० अंगणवाड्या डिजिटल केल्याने असून शासनाला आता जिल्ह्यातील संदर्भित माहिती टॅबच्या
माध्यमातून उपलब्ध होत आहे.

blank