34.3 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा हवी-आ.विनोद अग्रवाल

अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा हवी-आ.विनोद अग्रवाल

0
37

blank

गोंदिया,दि.19 : तालुक्यातील मुंडीपार/एमआयडी परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीवर दोन युवकांनी अ‍ॅसिड हल्ला चढविला. या प्रकरणात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. या प्रकरणाचा निषेध नोंदवित घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आ.विनोद अग्रवाल यांनी सरकारकडे केली आहे. त्याचप्रमाणे पीडित विद्यार्थिनीच्या उपचाराची जबाबदारीही सरकारने स्विकारावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याच बरोबर गोंदिया जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे, या गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष केंद्रीत करावे, असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
अ‍ॅसिड हल्ला प्रकरणावर दु:ख व्यक्त करताना आ.विनोद अग्रवाल यांनी घटनेचा निषेध नोंदविला. एका युवकाचा अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेची शाई सुकली नाही की, गोंदिया तालुक्यातील मुंडीपार परिसरात दोन युवकांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर हल्ला चढविला. ही घटना गोंदियाच्या इतिहासात पहिलीच आहे. त्या घटनेचा निषेध नोंदविला. त्याचप्रमाणे या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, या अनुषंगाने तपासकार्य करावे, अशीही मागणी त्यांनी केली. पीडित विद्यार्थिनीला शासनाकडून विशेष मदतीसह औषधोपचाराची व्यवस्था करावी अशीही मागणी आ.विनोद अग्रवाल यांनी केली आहे. गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. हत्या, वाटमारी, चोरी, अपहरण, बलात्कार यासारख्या घटना वाढत चालल्या आहेत. यामुळे गोंदिया जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. या गंभीर बाबीकडेही शासनाने लक्ष केंद्रीत करावे, अशीही मागणी आ.विनोद अग्रवाल यांनी केली आहे.

blank