गोंदिया:तालुक्यातील मुंडीपार/एमआयडी परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या एका दलित विद्यार्थिनीवर दोन युवकांनी अॅसिड हल्ला चढविला. या प्रकरणात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली.
या प्रकरणाचा निषेध नोंदवित घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आ.विनोद अग्रवाल यांनी
लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे. त्याचप्रमाणे पीडित विद्यार्थिनीच्या उपचाराची जबाबदारीही सरकारने
स्विकारावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याच बरोबर गोंदिया जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे, या गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष वेंâद्रीत करावे, असाही प्रश्न उपस्थित केला आहे.




