28.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ २५ वा शहिद श्रध्दांजली कार्यक्रम २५ डिसेंबर रोजी

२५ वा शहिद श्रध्दांजली कार्यक्रम २५ डिसेंबर रोजी

0
41
गोंदिया,दि.२५ : आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने ११४ शहिद गोवारी बांधवांच्या स्मरणार्थ २५ वा शहिद श्रध्दाजंली कार्यक्रम २५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता खिल्यामुठ्या देवस्थान मरारटोली येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात गोवारी रॅली, समाज प्रबोधन व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे शहर अध्यक्ष डी.टी.चौधरी राहणार आहेत. तर दिप प्रज्वलक म्हणून गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, स्मारक पुजक तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले व प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी गोवारी समाजाचे शालिक नेवारे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, न.प.चे बांधकाम सभापती सचिन शेंडे, पुरूषोत्तम वाघ,  हेमराज नेवारे, अ‍ॅड.मंगेश नेवारे, घनश्याम पानतवणे, मारोतराव वाघाडे त्याचप्रमाणे मार्गदर्शक म्हणून माधव चचाणे, का.ज.गजबे, बळीराम राऊत, मधुमती नेवारे आदिंसह समाजाच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाची सुरूवात सकाळी १०.३० वाजता इंदिरा गांधी स्टेडियम येथून गोवारी रॅलीने होणार आहे. शहरातील प्रमुख चौकातून भ्रमण केल्यावर खिल्या मुठ्या देवस्थान येथे पोहोचणार, दरम्यान रॅलीचे सभेत रूपांतर केले जाईल. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले।