32.1 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ देवरीत दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

देवरीत दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

0
26
देवरी,दि. 25 – स्थानिक पायोनिअर पब्लिक स्कूल येथे शिक्षण विभागाच्या वतीने दोन दिवसीय तालुका स्तरिय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन गेल्या गुरूवारी (दि.19) करण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनाचे उग्घाटन जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी देवरी पंचायत समितीच्या सभापती सुनंदा बहेकार ह्या होत्या. यावेळी पंचायत समिती सदस्य अर्चना ताराम, गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डी बी साकुरे, येटरे, गटसमन्वयक धनवंत कावळे, नीना जायस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.
 या प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी मोटघरे हे होते. यावेळी पंचायत समिती सदस्य महेंद्र मेश्राम, श्री. साकुरे, येटरे. सेवानिवृत्त शिक्षक हंसराज तागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनात एकून ४८ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक सहभागी झाले होते. 
  कार्यक्रमाचे संचलन श्री गजभिये यांनी केले.  उपस्थितांचे  आभार विजय लोथे यांनी मानले.